दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ ‘दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य’ (एम.एस.के.) ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष असून अँड. मोहनराव पिंपळे हे अध्यक्ष आहेत. नुकताच मुंबई येथील ग्रँड हयात, सांताक्रुज येथे हा रंगतदार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यंदाचा ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार २०१५ सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना किरण शांताराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री मा. विनोदजी तावडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
चित्रपटगृहामध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात येतं. आता राष्ट्रगीतापूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या कार्याचा गौरव करणारी एक चित्रफीत यापुढे दाखवली जाणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दादासाहेब फाळके एम.एस.के. ट्रस्टतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना यंदाचा फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी तावडे बोलत होते.
दादासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ही चित्रफीत 30 सेकंदांची असेल. जो चित्रपट आपण पडद्यावर पाहत आहोत, त्या कलेचे पितामह दादासाहेब फाळकेंबाबत जनसामान्यांना माहिती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मराठी सिनेसृष्टीतील नामवंत तारे-तारकांचा सहभाग असलेल्या नृत्य, संगीत, विनोदी स्कीटने या कार्यक्रमाची रंगत वाढवून उपस्थितांची मने जिंकली तर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या खुमासदार सुत्रासंचालानाने सोहळ्याची शोभा वाढवली.
आम्ही ३० एप्रिल २०१५ रोजी दादर मुंबई येथे दादासाहेब फाळके यांची सुवर्ण जयंती साजरी केली यावेळी सिनेसृष्टीतील कलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते.