“आम्ही तुमच्या मदतीने तळा-गाळातील लोकांना मदत करायचा प्रयत्न करीत आहोत, आम्हाला खात्री आहे आमच्या कार्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल.”
आमचा वैविध्य पूर्ण बुद्धीजीवी शिस्तपालन करणारा संघ आहे आमच्यात, वैद्यकीय, जीवन विज्ञान, अर्थशास्त्र, मनोरंजन, सामाजिक कार्य, कायदे.. या क्षेत्रातील अनुभवी व प्रशिक्षित व्यक्ती आहेत. आम्ही सामाजिक प्रश्नासंबंधी संशोधन करून त्या प्रश्नावर पैलू पाडून त्या विषयी प्रकल्प तयार केले, व सामाजिक- राजकीय आरोग्य, शिक्षण या विषयीची कामे हाती घेतली व त्याची स्थापना करून त्या गोष्टीचा फायदा गरजू व गरीब लोकांना कसा होईल या विषयाचा आढावा घेतला
शिक्षण हि एक उत्तम देणगी आहे जी मुलांना आपण देऊ शकतो. शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम बनवतो, ट्रस्ट विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देत आहे, शिक्षण घेणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. जीवन कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शैक्षणिक सुविधा आणि इतर तांत्रिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम व व्यावसायिक शिक्षण यामध्ये रुची असणाऱ्यांना ट्रस्ट दर्जेदार शिक्षण पुरवते. खेळणे व शारीरिक उपक्रम अविभाज्य विद्यार्थ्याच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे खेळात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ट्रस्ट मदत करते.
गरीब मुलांना शिक्षण
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सोयी
तांत्रिक आणि अभियांत्रिकी महाविद्यालये
वैद्यकीय महाविद्यालये आणि आधुनिक सोयींची इस्पितळे
अनाथ व रत्त्यावरील मुलांसाठी शिक्षण
गरीब मुलांसाठी वह्या पुस्तके आणि स्टेशनरी पुरवणे.
रोजगाराभिमुख कौशल्याचे युवकांना प्रशिक्षण
व्यावसायिक प्रशिक्षणाचे कार्यक्रम
स्पोर्टस प्रमोशन
शाळा व महाविद्यालयीन उपकरणाचे वितरण व आर्थिक मदत
गरीब व गरजूंना आर्थिक मदत
महिला जागृती शिबीर / महिला सबलीकरण
मुलगी वाचवा आंदोलन / मोफत कुटुंब सल्ला
विवाह पूर्व समुपदेशन / समुदाय आणि ग्रामीण विकास
आपल्या देशातील गरजू लोकांना धान्य, कपडे आर्थिक मदत पुरवणे
वैद्यकीय महाविद्यालये नर्सिंग महाविद्यालया समवेत
मोफत धर्मदाय रुग्णालये
सामुदायिक आरोग्याची काळजी
अपंगत्व आणि व्यसन मुक्ती व्यवस्थापन
मोफत वैद्यकीय सेवांचे आयोजन / मोफत डोळे तपासणी, चष्मे व औषधांचे वितरण
महिलाश्रम / वृद्धाश्रम
ज्या वयस्कर व्यक्तींना त्यांच्या मुलांनी घरातून घालवून दिले आहे व त्यांच्या राहण्याची सोय नाही अशा व्यक्तींना आधार देते. दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्ट वृध्द व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम करते.
दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्ट आजारी, अपंग, निराधार वृध्द व्यक्तीच्या भौतिक, भावनिक, अध्यात्मिक, आणि सामजिक गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील व वचनबध्द आहे, तसेच अशा या सामाजिकदृष्ट्या पिचलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद निर्माण करून त्यांना एक निवारा देते.
दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्टला चित्रपट निर्मिती लघुपट, ध्वनिफिती व चित्रफिती, चर्चासत्राच्या अभिव्यक्ती माध्यमातून सेवा करायची इच्छा आहे. समाजात वैयक्तिक रित्या जागरुकता निर्माण करणाऱ्यांसाठी निधी गोळा करण्याचा आमचा हेतू आहे. आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे.
जे कलाकार व तंत्रज्ञ वयोमानानुसार त्यांच्याकडून काम होत नसल्यामुळे व काही काम मिळत नसल्यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करीत आहेत त्यांना आम्ही आर्थिक मदत करतो.
सिनेसृष्टीला प्रेरणा देण्यासाठी व त्यांचा आदर करण्यासाठी भारतात व परदेशात दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्ट तर्फे पुरस्कारांचे आयोजन करण्याचा मानस आहे.