-
January 1st, 2016
दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्कार २०१५
दादासाहेब फाळके यांच्या स्मर... -
April 30th, 2015
सुवर्ण जयंती महोत्सव ३० एप्रिल २०१५ रोजी संपन्न
आम्ही ३० एप्रिल २०१५ रोजी दादर... - More
मुंबईत असलेली दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्ट ही संस्था ना नफा-ना तोटा या तत्त्वावर चालणारी धर्मदाय ट्रस्ट आहे. महिला-सबलीकरण, ग्राम-सक्षमीकरण तसेच शहरातील गरीब नागरिकांना स्वावलंबी बनवणे, त्यांचा सामाजिक स्तर वाढवणे त्यांचात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे, व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, अशा मुलांचे भविष्य घडविणे प्रत्येक मुलाला चांगल्या शिक्षणाची संधी प्राप्त करून देणे यासाठी आम्ही सदैव कार्यरत असतो. कलाकार व तंत्रज्ञ वयोमानानुसार त्यांच्याकडून काम होत नसल्यामुळे व काहीही काम मिळत नसल्यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करीत आहेत त्यांना आम्ही आर्थिक मदत करतो. आम्हाला माहित आहे आम्ही समाजात पसरलेला अंधार संपूर्णतः दूर करू शकत नाही. परंतु समाजातील काही भागातील अंधार दूर करून प्रकाश पसरविण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करु. दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्ट लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते, त्यामुळे आम्हाला खात्री आहे या कार्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल.