[Best_Wordpress_Gallery id=”9″ gal_title=”Award Function”]


दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्ट ही मोठ्या तळमळीने कार्य करीत आहे. कमाल अमरोही स्टुडिओ मुंबई येथे मराठी चित्रपट सृष्टीसाठी प्रोहत्सनार्थ फारच दिमाखदार असा उत्तम सोहळा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच माननीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांच्या तब्बल अडीच तासाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सदरच्या सन्मान सोहळ्यास हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील कलाकार, अनेक दिग्गज व्यक्ती, तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यात अनेक कलाकारांनी नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी जेष्ठ अभिनेत्री श्रीमती “लीला गांधी” यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला व कनिष्ठ कामगार श्री. शामराव कांबळे, श्री भीमराव खोत, श्री प्रभाकर भोसले इत्यादी यांना स्मृतीचिन्ह मानधन देऊन त्यांच्या कामाची कृतज्ञता व्यक्त केली, त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले.