दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्ट ही ना-नफा ना- तोटा या तत्वावर चालणारी धर्मदाय ट्रस्ट आहे. शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, पुनर्वसन, रोजगार, सबलीकरण, मनोरंजन, पर्यावरण विकास, पाणी-पुरवठा व स्वच्छता असे उपक्रम राबवणे हे आमचे ध्येय आहे.
चांगली जीवनशैली हे आपल्या सर्वांचे स्वप्न असते, ते स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आमची ट्रस्ट सक्रिय आहे. आपण कुठे राहता? म्हणजे कोणत्या देशात राहता, कोणत्या राज्यात राहता, कोणत्या जिल्हात राहता तुम्ही कुठेही राहा, कोणतीही भाषा बोलत असा, कोणत्याही धर्माचे असा पण यात आमची ट्रस्ट तसूभर फरक न करता किंवा कोणताही भेदभाव न बाळगता आम्ही गरजूंना आर्थिक मदत प्रदान करतो.
मनोरंजाच्या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या किंवा येऊ इच्छिणाऱ्या देशा परदेशातील कलाकारांना आम्ही मोफत ट्रेनिंग, त्याच्या जाहिराती, गृहनिर्माण सुविधा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
- शिक्षण
- आरोग्य
- गृहनिर्माण
- उपजीविका
- पुनर्वसन
- संशोधन
- मनोरंजन
- पर्यावरण विकास
- महिला सबलीकरण