स्वर्गीय कै. धुंडिराज गोविंद फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० साली महाराष्ट्रातील नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे झाला. दादासाहेब फाळके या नावाने ते जनमानसात प्रसिध्द होते. भारतीय सिनेसृष्टीचे जनक म्हणून त्यांची ओळख आपल्याला आहे. ते भारतातील पहिले चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पट-कथाकार होते. भारतीय सिनेमाला दादासाहेब फाळके यांनी जन्म दिला. १९१२ मध्ये भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती दादासाहेब फाळके यांनी केली. चित्रपटाचे नाव होते, ” राजा हरिश्चंद्र” त्यांचा राजा हरिश्चंद्र हा मूकपट भारतीय सिनेसृष्टी मध्ये मैलाचा दगड ठरला, आणि त्यानंतर भारतात सिनेमाचे व्यावसायीकरण झाले. अशा या कलेची आराधना करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर ना नफा- ना तोटा या तत्त्वावर अतिशय प्रामाणिक व लोककल्याणार्थ चालणारी दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्ट….

समाजात पसरलेला अंधार दूर करून सर्वत्र प्रकाश पसरवण्याचा आमचा मानस आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या आयुष्यात असलेल्या दु:खाचे समस्यांचे निवारण व्हावे, यासाठी आमची ट्रस्ट सदैव सक्रिय आहे. आदिवासी समाज, रस्त्यावर राहणारी मुले आर्थिकदृष्ट्या मागास, समाजातील दुर्लक्षित गट, गरीब आजारी लोक यांना मदत करून त्यांच्या जीवनात आम्हाला आनंद पसरवायचा आहे, आणि ते कार्य आम्ही यशस्वीरित्या पार पाडू असा आमचा विश्वास आहे.